THE DANCE OF DECEPTION by Harriet Lerner

THE DANCE OF DECEPTION

By

Description

आपण स्वतःपासून आणि इतरांपासून कोणत्या गोष्टी लपवतो आणि त्यामागे वैयाQक्तक, कौटुंबिक, सामाजिक रूढींची कोणती कारणे असतात आणि त्याचे आपल्या आणि इतरांच्या आयुष्यांवर कोणते परिणाम होतात याचा अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय व आदरणीय नातेसंबंधतज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ विदुषी डॉ. हॅरिएट लर्नरनं घेतलेला हा आकर्षक शैलीतला परामर्ष आहे. स्त्रियांना सचोटी, धैर्य आणि आत्मसन्मान मिळावा यासाठी त्यांनी सुकर भाषेत विवेचन आणि मार्गदर्शन केलं आहे. स्त्रियांची जवळिकीसाठी जी धडपड चालू असते, त्या संदर्भात स्त्रियांनी केव्हा, किती आणि कसं बोलावं आणि बोलू नये, याबाबत आपल्या दोन दशकांच्या वैद्यकीय अनुभवांच्या आधारे त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आहे. खोटं बोललं जातं, लपवलं जातं. अर्धसत्य सांगितलं जातं त्याबाबतचे अनेक भावनिक पदर हळूवारपणे उलगडून विविध उदाहरणांद्वारे त्यांनी आपल्याला योग्य दिशा दाखवून दिली आहे. या विवेचनाचा प्रभाव आपल्याला गुंग करतो.

More Harriet Lerner Books