छांग यांनी त्यांच्या कुटुंबाच्या चीनअंतर्गत स्थलांतराची आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या स्थलांतराची कहाणी कुशलतेनं गुंफली आहे. चीनमध्ये अंदाजे १३ कोटी स्थलांतरित कामगार आहेत. त्यांपैकी जवळजवळ सगळेच तिशीच्या आतले आहेत. फॅक्टरी गर्ल्स पुस्तकामध्ये लेस्ली टी. छांग यांनी प्रामुख्याने दोन तरुणींची जीवनकथा उलगडून या कामगारांची कहाणी मांडली आहे. तोंगकुआन या औद्योगिक शहरामध्ये या दोघी तरुणी करिअरमध्ये असेम्ब्ली लाइनपासून मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नांत असतानाच्या तीन वर्षांतला त्यांचा जीवनसंघर्ष लेखिकेनं त्यांच्या सोबत राहून प्रत्यक्ष अनुभवला. छांग यांनी स्वतःचं रुग्णालय असलेला महाकाय स्नीकर कारखाना, विद्यार्थी अतिशय समर्पणानं शिकत असलेले इंग्रजीचे वर्ग, आणि मुलींना घर सोडून बाहेर पडायला लावणारी गरिबी आणि रिकामपणानं ग्रासलेली शेतीप्रधान गावं अशा ठिकाणांची सफर आपल्याला घडवली आहे. जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाचे असलेले फॅक्टरी गर्ल्स हे पुस्तक, ग्रामीण भागातल्या गावांपासून शहरांकडे होत असलेल्या प्रचंड स्थलांतरामुळे चिनी समाजामध्ये कसे बदल घडवत आहे, हे दर्शवते.